सिडको भवन  
मुंबई

सिडकोची महागृहनिर्माण योजनेची सोडत; घरासह व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी

मोहन कारंडे

नवी मुंबई : पुढारी वृतसेवा : सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध 4,158 घरांसोबतच 245 वाणिज्यिक गाळे आणि रेल्वे स्थानक संकुलांतील 6 कार्यालये विक्रीच्या योजना सिडकोने जाहीर केली आहे. 3 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. सर्वसामान्य नागरीक, व्यावसायिकांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि आपले घराचे आणि व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सिडकोने केले आहे.

महागृहनिर्माण योजनेंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4,158 घरे विक्रीकरिता उपलब्ध केले आहेत. परवडणार्‍या दरातील या 4,158 घरांपैकी 404 घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित 3,754 घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा सहा लाख तर अनुदानाची रक्कम अडीच लाख निश्चित केली आहे. नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी सदर घरे असलेली गृहसंकुले वसलेली आहेत. या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणार्‍या या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इ. सर्व सामाजिक सुविधाही उपलब्ध आहेत. या योजनांद्वारे समाजातील सर्व घटकांना सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे, ज्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात मदत होण्यासोबतच नवी मुंबईच्या वाणिज्यिक क्षमता वृद्धिंगत होऊन शहराच्या आर्थिक विकासासही हातभार लागणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह छोटे व्यापारी व व्यावसायिकांना विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT