मुंबई

श्रद्धा हत्या प्रकरणात तातडीने कारवाईचे आदेश : ओम प्रकाश बिर्ला

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : वसईतील श्रद्धा नावाच्या तरुणीच्या हत्येप्रकरणी कारवाईचे निर्देश दिले असल्याची माहिती लोकसभेचे सभापती ओम प्रकाश बिर्ला यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांना मुंबईत दिली.

मुंबई दौर्‍यावर आलेल्या बिर्ला यांना डॉ. गोर्‍हे यांनी निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. त्यावर बिर्ला यांनी ही माहिती दिली. महिलांच्या सुविधांसाठी मोक्याच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास व्हावा, अशीही मागणी त्यांनी केली. केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून महाराष्ट्रातील दुर्ग, मंदिरे याकडे दुर्लक्ष होत असल्याकडेही निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

लष्करात आणि महत्त्वाच्या ठिकाणी काम करणार्‍या महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आत्मसन्मानासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाव्यात. श्रद्धा वालकरच्या हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली जावी, अशा मागण्या या निवेदनात केल्या आहेत. तर याप्रकरणी राज्य सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी डॉ. गोर्‍हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. त्यावर त्यांनी त्वरित संमती दिली.

SCROLL FOR NEXT