मुंबई

रवींद्र वायकर यांची 8 तास ईडी चौकशी

Arun Patil

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे शिवसेना आमदार रविंद्र वायकर यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी तब्बल आठ तास चौकशी केली. नेमक्या कोणत्या प्रकारणात ही चौकशी झाली अद्याप स्पष्ट होऊल शकले नाही. मात्र ईडीच्या या चौकशी ने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

जोगेश्वरी मतदार संघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे आमदार आहेत. ते मागील सरकारच्या काळात परिवहनमंत्री होते. ईडीने त्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये समन्स बजावले होते. त्यानुसार, वायकर हे मंगळवारी सकाळी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यांची तब्बल आठ तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीबाबत ईडीने कमालीची गुप्तता बाळगली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. त्यात आता वायकर यांचीही भर पडल्याने चर्चांना एकच उधाण आले आहे.

SCROLL FOR NEXT