मुंबई : पुढारी ऑनलाईन डेस्क
ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक झाले असून त्यासाठी त्यांनी मुंबईत मोर्चा काढला. दरम्यान, प्रवीण दरेकर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अन्य काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान, भाजपचा मोर्चा पोलिसांनी रोखला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. आमचा लढा सुरूच राहील, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.