मुंबई

मुंबईत तीन दहशतवादी घुसल्याचा खोटा कॉल; एकावर गुन्हा दाखल

दिनेश चोरगे

मुंबई : मुंबईमध्ये तीन अतिरेकी घुसले असून त्यांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा दावा करणारा एक कॉल मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात आल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली.

मुंबई पोलिसांनी या कॉलची दखल घेत मुंबईत हाय अलर्ट जारी करत शहरातील बंदोबस्तात वाढ केली. तसेच या कॉलची माहिती राज्यातील आणि केंद्रातील गुप्तचर व तपास यंत्रणांना देत पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी केलेल्या तपासात हा खोटा कॉल असल्याचे स्पष्ट झाले असून कॉल करणार्‍याविरोधात आझाद मैदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कॉलरचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT