मुंबई

मुंबई, सांगली साताऱ्यासह राज्यातील 25 एसपींच्या बदल्या

दिनेश चोरगे

नवी मुंबई: पुढारी वृत्तसेवा :  राज्य पोलिस दलातील 25 पोलिस उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. कोरोनामुळे या बदल्या रखडल्या होत्या. या बदल्यांमध्ये ठाणे, मुंबई आणि एसआरपीएफ नवी मुंबई येथील सहा अधिकार्‍यांचा समावेश आहे. बदली झालेल्या पोलिस अधीक्षकांमध्ये सातारा, सांगली जिल्हा अधीक्षकांचा समावेश आहे.

ठाणे पोलिस आयुक्तालयातील लक्ष्मीकांत पाटील यांची बदली पोलिस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे प्राचार्य म्हणून करण्यात आली. तर पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांना विशेष सुरक्षा विभागात नियुक्ती मिळाली आहे. श्रीकृष्ण कोकाटे यांची मुंबईतून नांदेड पोलिस अधीक्षक म्हणून तर निलोत्पल यांची मुंबईतून गडचिरोलीला, संदीप घुगे यांची अकोला येथे बदली करण्यात आली आहे.

पोलिस महासंचालकांनी 15 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर बढती देत त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते. त्यानंतर गुरुवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकाळ पूर्ण केलेल्या 25 पोलिस उपायुक्त आणि पोलिस अधीक्षकांच्या बदलीचे आदेश काढले. तर बदली झालेल्या 19 अधिकार्‍यांना कुठेही नियुक्ती देण्यात आली नसून, त्यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्र काढले जाणार आहेत. ठाणे लाचलुचपत विभाग पोलिस अधीक्षकपदी अद्याप तरी कुणाचीही वर्णी लागलेली नाही.

धनंजय कुलकर्णी यांची रत्नागिरी पोलिस अधीक्षक, पवन बनसोड अपर पोलिस अधीक्षक औरंगाबाद ते सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक, बसवराज तेली नागपूर ते सांगली पोलिस अधीक्षक, शेख समीर अस्लम अपर पोलिस अधीक्षक गडचिरोली ते सातारा पोलिस अधीक्षक, अंकित गोयल पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे नाशिक पोलिस अकादमी ते सोलापूर ग्रामीण पोलिस अधीक्षक, राकेश ओला एसीबी नागपूर ते अहमदनगर पोलिस अधीक्षक, एम. राजकुमार लोहमार्ग नागपूर ते जळगाव पोलिस अधीक्षक, श्रीमती रागसुधा आर. एसआरपीएफ गट क्रं. 3 जालना ते परभणी पोलिस अधीक्षक, संदीप गिल एसआरपीएफ गट क्रं. 12 हिंगोली ते पोलिस अधीक्षक हिंगोली, श्रीकृष्ण कोकाटे मुंबई ते नांदेड पोलिस अधीक्षक, सोमय मुंडे अपर पोलिस अधीक्षक गडचिरोली ते लातूर पोलिस अधीक्षक, सारंग आव्हाड नागपूर ते बुलढाणा पोलिस अधीक्षक, गौरव सिंह नाशिक पोलिस अकादमी ते यवतमाळ पोलिस अधीक्षक, संदीप घुगे एसआरपीएफ गट क्रं. 11 ते पोलिस अधीक्षक अकोला, रवींद्रसिंग परदेशी गुप्तवार्ता विभाग मुंबई ते पोलिस अधीक्षक चंद्रपूर, नुरुल हसन नागपूर ते वर्धा पोलिस अधीक्षक, निखिल पिंगळे लातूर पोलिस अधीक्षक ते गोंदिया पोलिस अधीक्षक, निलोत्पल पोलिस उपायुक्त मुंबई ते पोलिस अधीक्षक गडचिरोली, संजय बारकुंड नाशिक ते धुळे पोलिस अधीक्षक, सिंगुरी आनंद राज्यपाल परिसहायक ते पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण, सचिन पाटील नाशिक ग्रामीण ते औरंगाबद गुन्हे अन्वेषण विभाग, लक्ष्मीकांत पाटील ठाणे शहर ते नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्र आणि पराग मणेरे यांची मुंबई विशेष सुरक्षा विभागात बदली करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक मोहित गर्ग, राजेंद्र दाभाडे, दीक्षितकुमार गेडाम, अजयकुमार बन्सल, अभिनव देशमुख, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, प्रविण मुंडे, जयंत मीना, राकेश कलासागर, पी. पी. शेवाळे, अरविंद चावरिया, दिलीप पाटील भुजबळ, जी. श्रीधर, अरविंद साळवे, प्रशांत होळकर, विश्वा पानसरे, प्रवीण पाटील आणि निकेश खाटमोडे बदलीच्या प्रतीक्षेत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT