मुंबई : सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवासी कुटुंबाकडून 4 कोटी रुपये मूल्य असलेले 4 लाख 97 हजार अमेरिकन डॉलर्स जप्त केले.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. कुटुंबाच्या सामानात साड्या आणि पादत्राणांमध्ये ही रक्कम लपविण्यात आली होती. पुढील तपास सुरू असल्याचे सीमा शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.