मुंबई

मुंबई : मॉडेलकडे मागितले १५ लाख; पॉर्न व्हिडीओच्या अभिनेता-दिग्दर्शकाला अटक

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कांदिवलीतील एका पॉर्न रॅकेटचा चारकोप पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पॉर्न व्हिडीओचा अभिनेता आणि दिग्दर्शक अनिरुद्ध प्रसाद झगडे याला पोलिसांनी अटक केली असून त्याला स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात यास्मिन खान, अमीत पासवान आणि आदित्य या तिघांचा सहभाग उघडकीस आला आहे. या चौघांनी पॉर्न व्हिडीओ एका खासगी अॅपमध्ये व्हायरल करुन व्हिडीओ डिलीट करण्यासाठी तक्रारदार मॉडेलकडे पंधरा लाखांची मागणी केल्याचे उघडकीस आले आहे.

२९ वर्षांची तक्रारदार मॉडेल असून तिने आतापर्यंत अनेक नामांकित कंपनीच्या जाहिराती केल्या आहेत. तिला मॉडलिंग क्षेत्रासह बॉलीवूडमध्ये करिअर करायचे होते. त्यासाठी तिचे प्रयत्न सुरु होते. तिने तिची प्रोफाईल तिच्या सोशल मिडीयावर अपलोड केली होती. ऑक्टोबर २०२२ रोजी तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो एक वेबसिरीजची निर्मिती करीत असून त्यासाठी तो तिला अभिनेत्री म्हणून घेण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले. ही वेबसिरीजचा विषय बोल्ड असल्याने त्यात तिच्यावर काही आक्षेपार्ह चित्रीकरण करण्यात येईल. तसेच ती भारतात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. तिने त्यास नकार दिला. तिला बोल्ड दृश्य देण्यास आक्षेप नसून ती वेबसिरीज भारतात प्रदर्शित होणार असल्याने तिने त्यास नकार दिला होता. काही दिवसांनी या व्यक्तीने तिला पुन्हा फोन करुन आपण ही वेबसिरीज भारतात नव्हे तर विदेशात प्रदर्शित करणार आहोत, त्यामुळे तिने त्यात काम करावे अशी विनती केली.

ही विनंती मान्य करुन तिने वेबसिरीजमध्ये काम करण्यास होकार दिला. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला. या करारात तिला काही अटी घालण्यात आल्या होत्या. वेबसिरीजच्या शूटींगसाठी कांदिवलीतील चारकोप परिसरातील पॉश फ्लॅटमध्ये बोलाविण्यात आले. तिथे तिच्यासोबत इतर चारजण होते. अनिरुद्ध या वेबसिरीचा दिग्दर्शक तसेच अभिनेता होता. त्याच्यासोबत अमीत सहकलाकार होता तर यास्मिन ही कॅमेरामन म्हणून काम पाहत होती.
तिथेच तिला न्यूड होण्यास सांगितले. यावेळी तिने आपण बोल्ड सिन देण्यास तयार आहोत, मात्र न्यूड होण्यास तिने नकार दिला होता. त्यानंतर तिला कराराची धमकी देऊन न्यूड होण्यास प्रवृत्त करण्यात आले होते. या दोघांनी बोल्ड सीन करताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. जवळपासून ४० ते ५० मिनिटांचा तिच्यासोबत पॉर्न व्हिडीओ बनविण्यात आला. काही दिवसांनी तिला तिचा पॉर्न व्हिडीओ एका खाजगी अॅपमध्ये व्हायरल झाल्याचे समजले.

गुन्हा दाखल होताच शनिवारी या पॉर्न व्हिडीओचा दिग्दर्शक आणि अभिनेता अनिरुद्धला पोलिसांनी अटक केली. अटकेच्या भीतीने यास्मिन खान या महिलेने दिंडोशीतील विशेष सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावली होणार आहे. पोलिसांनी पॉर्न व्हिडीओ ताब्यात घेतले असून तो व्हिडीओ डिलीट केला आहे. त्यात मॉडेलवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT