मुंबई

मुंबई – बारावी परीक्षेवरील पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे

स्वालिया न. शिकलगार

मुंबई – पुढारी आॅनलाईन डेस्क – आज दि. २ मार्च रोजी शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्यासमवेत महासंघ नियामक मंडळासमवेत सविस्तर चर्चा होऊन महासंघाने सादर केलेल्या मागण्यांपैकी महत्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे महासंघाने पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन मागे घेतले आहे.

मान्य मागण्या अशा –

१) १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या विनाअनुदानित, अंशत: अनुदानीत, अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.

२) १०-२०-३० वर्षांनंतरची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्या येईल. व त्या बाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे आजच सादर करण्यात आला.

३) २१४ व्यपगत पदांना उच्च स्तरीय सचिव समितीने मंजुरी दिली आहे. त्या बाबतचा शासन आदेश १५ दिवसात निर्गमित करण्यात येईल. उर्वरित कार्यरत असलेल्या वाढीव पदावरील शिक्षकांना अधिवेशन काळातच उच्च स्तरीय सचिव समितीची बैठक आयोजित करून मान्यता देण्यात येईल.

४) आय टी विषय नियुक्ती मान्यता प्राप्त शिक्षकांना अनुदानित पद मान्यता व वेतनश्रेणी लागू करण्यातबाबत वित्त विभागाकडे पुढील १५ दिवसात प्रस्ताव सादर केला जाईल.

५) अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द करण्याबाबत महासंघाने आवश्यक त्या सुधारणा शिक्षण विभागाकडे सादर कराव्यात.

६) शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

७) कनिष्ठ महाविद्यालयाच्या तुकडीसाठी विद्यार्थी संख्येचे निकष शासनाने पूर्वी मान्य केल्या प्रमाणेच असतील.

८) १ डिसेंबर २०२२ रोजी प्रलंबित असलेल्या प्रस्तावाची पडताळणी करून मान्यता देण्यात येईल.

९) DCPS/NPS चे हिशोब शिक्षकांना मार्च २०२३ अखेर देण्यात येतील.

इतर मागण्यांबाबत अर्थसंकल्पिय अधिवेशन संपल्यानंतर बैठक आयोजित करण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

याप्रसंगी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव रणजित सिंह देओल, सहसचिव काझी, उपसचिव समीर सावंत, उपसचिव तुषार महाजन, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, संचालक कृष्ण कुमार पाटील, राज्य महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे, समन्वयक प्रा मुकुंद आंदळकर, सरचिटणीस प्रा संतोष फाजगे, कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर, उपाध्यक्ष प्रा. विलास जाधव, प्रा. अविनाश बोर्डे, प्रा. अशोक गव्हाणकर, प्रा. सुनील पूर्णपात्रे उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT