मुंबई

मुंबई : प्रोडक्ट विक्रीत महिलांची 24 लाखांची फसवणूक

दिनेश चोरगे

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  ऑनलाईन प्रोडक्ट विक्री व्यवसायात चांगला परवाता देण्याचे आमिष दाखवून तीन महिलांची सुमारे 24 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी श्री अग्रवाल आणि मयांक अग्रवाल या जोडप्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. 50 वर्षांची तक्रारदार महिला अंधेरीतील वर्सोवा परिसरात पती आणि मुलीसोबत राहते. तिचे पती अदानी इलेक्ट्रीकसिटीच्या अंधेरीतील एमआयडीसी शाखेत सुरक्षा विभागात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. याच ठिकाणी श्री अग्रवाल ही महिला ह्युमन रिसॉर्स विभागात वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करते. त्यामुळे ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत.

काही महिन्यांपूर्वी श्री अग्रवालने त्यांना ऑनलाईन प्रोडक्टसंदर्भातील एक योजना सांगितली होती. या कंपनीत गुंतवणूक केल्यास कंपनीचे प्रोडक्ट मिळतील, ते प्रोडक्ट ऑनलाईन विक्री केल्यास त्याचा त्यांना दररोज फायदा होईल. गुंतवणुकीवर चांगला परवाता मिळत
असल्याने त्यांनी ती योजना त्यांच्या पत्नीला सांगितली. काही दिवसांनी तिने झूम मिटींगमध्ये त्यांना पुन्हा कंपनीची योजना समजावून सांगून
त्यात त्यांना अशा प्रकारे फायदा होतील याची माहिती दिली होती. या योजनेत तिने आणखीन काही लोकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यास सांगितले होते.

तिच्या आमिषाला बळी पडून तिच्या पतीच्या कामावरील दोघांच्या पत्नीने या कंपनीत गुंतवणूक केली. त्यात एका महिलेने 4 लाख 37 लाख रुपये, दुसर्‍या महिलेने नऊ लाख रुपये आणि तिने स्वतःसह मुलांच्या नावाने सव्वाअकरा लाख रुपये असे 24 लाख 57 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. श्री अग्रवालच्या सांगण्यावरुन तिचे पती मयांक अग्रवाल यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात आली होती. मात्र त्यांना कंपनीचे कुठलेही प्रोडक्ट मिळाले नव्हते. वारंवार विचारणा करुनही ते दोघेही त्यांना टाळत होते. त्यामुळे या तिन्ही महिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.

SCROLL FOR NEXT