मुंबई

मुंबई : टाटा एअरबस प्रकल्पावरून राष्ट्रवादी-भाजपमध्ये जुंपली

दिनेश चोरगे

मुंबई;  पुढारी वृत्तसेवा :  वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पावरून उठलेले वादळ शमले नसताना आता टाटा एअरबस
प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये जुंपली आहे. महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प गुजरातला हस्तांतरित करण्यासाठीच भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रिपदावर बसवले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी गुरुवारी यूकेच्या पंतप्रधान लीज ट्रस यांनी जसा राजीनामा दिला तसे महाराष्ट्राचे हित जपता न आल्याने शिंदे यांनी तत्काळ मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी गुरुवारी केली.

तपासे यांनी गुरुवारी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. शिंदे यांना महाराष्ट्रात गुंतवणूक आणि प्रकल्प टिकवून ठेवण्यात वारंवार अपयश आल्याचे ते म्हणाले. गुजरातचा महाराष्ट्रावर  सर्जिकल स्ट्राईक सुरू असताना शिंदे आपले मुख्यमंत्रिपद सुरक्षित ठेवण्यात व्यस्त आहेत, असा आरोपही तपासे यांनी केला आहे.

वेदांता-फॉक्सकॉन बाहेर पडल्यानंतर सी-295 मिलिटरी ट ?ान्सपोर्ट एअरक्राफ्ट तयार करण्याचा टाटा एअरबसचा प्रकल्प नागपुरात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले होते. मात्र तसे झाले नाही,
याकडे तपासे यांनी लक्ष वेधले.

 स्वत:चे पाप झाकण्याचा प्रयत्न … उपाध्ये

सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट ?ाच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, असे प्रत्युत्तर महाराष्ट ? भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तपासे यांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यावर 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. असे असतानासुद्धा हा प्रकल्प महाराष्ट ?ात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करू नये. टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान केशव उपाध्ये यांनी दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT