मुंबई

मुंबई : गुजरात पोलिसांचाही तिथेच छापा; तेराशे कोटींचे एमडी जप्त

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  गुजरातमधील भरुच जिल्ह्यात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने 1
हजार 26 कोटींचे ड्रग्ज जप्त केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या गुजरात पोलिसांनी त्याच अंकलेश्वर तालुक्यातील पानोलीमध्ये आणखी एका ठिकाणी छापा टाकून 1 हजार 383 कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्जसह 1 हजार 300 लिटर
द्रवपदार्थ आणि 82.3 किलो पावडर जप्त केली. गुजरात पोलिसांनी दोघांना अटक केली असून, या कारवाईची माहिती मुंबई पोलीस घेत आहेत. याचे मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाशी कनेक्शन आहे का, हे आता तपासले जाईल.

नालासोपार्‍यातून एमडी ड्रग्ज विक्रीचे रॅकेट चालविणार्‍या मास्टरमाईंड प्रेमप्रकाश सिंहच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी पानोली जीआयडीसीमधील गिरीराज दीक्षितच्या फॅक्टरीतून ड्रग्जचा साठा जप्‍त केला होता.

आता गुजरात पोलिसांच्या कारवाईनंतर मुंबई पोलीस कोठडीत असलेल्या दीक्षितची पुन्हा चौकशी करत आहेत. प्रेमप्रकाशने दीक्षितकडून 2021 पासून ड्रग्ज बनवून घेत असल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे.

SCROLL FOR NEXT