मुंबई

मुंबई : गुंगीचे औषध देऊन प्रवाशाला लुटणारा जेरबंद

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशाला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन लूटणार्‍या मोहम्मद सलीम मोहम्मद एजाज खान या आरोपीस रेल्वे पोलिसांनी एक महिन्यानंतर अटक केली.

शब्बीर मेहबूबसाहब बाशा शेख हे कुवेत येथे ड्राव्हरचे काम करतात. 2 जुलै रोजी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळावर उतरुन चैन्नई एक्सप्रेसने जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकात आले होते. ते जनरल हॉलमध्ये बाकड्यावर बसले होते. आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद एजाज खान याने आप किधर से आये हो, असे विचारले असता शेख यांनी मैं कुबेत से आया हु असे सांगितले. तर खान याने आपण सौदीहून आल्याचे सांगितले. बोलण्यातून ओळख काढून शेख यांना खान याने बेस्ट आगरच्या समोरील बागेमध्ये नेले. तेथे त्याने त्याच्याकडील थंड पेयाची बॉटल व वेफर्स खाण्यासाठी दिले. शेख यांनी शितपेयाचे तीन घोट घेतले. ते सीएसएमटी स्थानकात आले असता बेशुद्ध पडले. त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयसात नेण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT