मुंबई

मुंबई : आरेतील कारशेडचे मुख्यमंत्री शिंदेंकडून जोरदार समर्थन

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत मेट्रो 3 चे कारशेड आरे कॉलनीत उभारण्याचे जोरदार समर्थन केले. हे कारशेड आरेच्या जंगलात उभारले जात नसल्याचे सर्वांनाच माहीत होते, असा दावाही त्यांनी केला.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेडच्या बांधकामाला असलेली स्थगिती उठवली. या निर्णयाला पर्यावरण प्रेमींसह शिवसेनेचा विरोध आहे. हा विरोध लक्षात घेऊन शिंदे यांनी आरेतील मेट्रो कारशेडच्या डेपोविषयी तसेच
न्यायालयाच्या निर्णयाविषयी सभागृहाला सविस्तर माहिती दिली. मेट्रो प्रकल्पात जायका कंपनीचा 50 टक्के तर केंद्र सरकारचा 20 टक्के निधी आहे. आरेत कारशेडचा निर्णय झाला नसता तर उद्या भयानक कोर्टबाजी होऊन भविष्यात हा प्रकल्प झालाच नसता, असे
त्यांनी शिवसेनेला सुनावले. आरेतील मेट्रो कारशेडला काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिली होती.
तरीही काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्या घरासमोर आंदोलन करतात. त्यामुळे तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही समजावून सांगा, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.

आरेत फिल्मसिटी, एमएडीसी, मोर्डेन बेकरी यांना जागा दिलेली आहे. आरेतील 1 हजार 285 हेक्टर जागेपैकी फक्त 25 हेक्टर जागा
कारशेड डेपोसाठी दिली आहे आणि ही जागा आता जंगलातील नाही. या जागेच्या तीन बाजूला रस्ते आहेत, अशी माहिती देताना शिंदे यांनी आता कारशेडच्या जागेसाठी एकही झाड तोडावे लागणार नाही, अशी माहिती दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT