मुंबई

चार कोटींच्या एमडीसह दोघांना बेड्या

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा
कुर्ला येथे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. शिरीष राजू धडके (29) आणि दिलीप संभाजी खरटमोल (47) अशी या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 4 कोटी 60 लाख 50 हजार रूपयांचे 3 हजार 070 ग्रॅम वजनाचे एमडी जप्त केले.

कुर्ला पश्चिमेकडील लाल बहादूर शास्त्री मार्ग परिसरात तस्कर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज घेऊन येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष पाचमधील पोलीस शिपाई प्रमोद पाटील यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक घनश्याम नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने 15 जूनला बोहरा कब्रस्थान परिसरात सापळा रचला. धारावीतील धडके याच्याकडे 4 कोटी 60 लाख 50 हजार रूपयांचे 3 हजार 070 ग्रॅम वजनाचे एमडी पोलिसांना सापडले.पोलिसांनी कुर्ला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत बेकायदेशीररित्या अंमली पदार्थ बाळगल्याचा गुन्हा नोंदवून धडके याला अटक केली. गुन्हे शाखेने हा गुन्हा आपल्या तपासावर घेत धडके याला अंमली पदार्थ पुरविणार्‍या खरटमोल याला तांत्रिक माहितीच्या आधारे बांन्द्रा परिसरातून ताब्यात घेत अटक केली आहे.

SCROLL FOR NEXT