मुंबई

आरेतील प्रस्तावित मेट्रो कारडेपो विरोधात मुंबई काँग्रेस करणार आंदोलन

अविनाश सुतार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा; आरेतील मेट्रो कारडेपोला विरोध करण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मुंबई काँग्रेसने दिला आहे. महाराष्ट्रामध्ये नुकतेच सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडी सरकार जाऊन एकनाथ शिंदे गट आणि भाजप मिळून सरकार आलेले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो कारडेपो गोरेगाव येथील आरे येथेच होणार अशी घोषणा केली आहे. आरेचे जंगल नष्ट करून केंद्रातील भाजप सरकार आणि देवेंद्र फडणवीस कारडेपो उभारण्याचा "बाल हट्ट" करत आहेत. पर्यावरणाचा नाश करणारा हा प्रकल्प आहे. सर्व स्तरातून याला विरोध होत आहे. मुंबईकरांना देखील हा प्रकल्प आरेमध्ये नको आहे. कांजूरमार्ग येथे याच प्रकल्पासाठी जागा प्रस्तावित केलेली आहे. कांजूरमार्ग येथेच मेट्रो कारडेपो उभा राहिला पाहिजे. आरेत कारडेपो उभारण्याचा प्रयत्न झाल्यास काँग्रेस आंदोलन करेल,असा इशारा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला आहे.

SCROLL FOR NEXT