मुंबई

आरे कॉलनीत आढळली मगर; नागरिकांमध्ये खळबळ

अनुराधा कोरवी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आरे कॉलनी येथील आंबाबाडी याठिकाणी मगर आढळल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली
आहे. बिबट्यानंतर आता मगरीची दहशत आरेमध्ये निर्माण झाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

आरे कॉलनीच्या आंबावाडी येथील रहिवासी चंदन चव्हाण यांना जंगलातील एका नाल्यात मगर असल्याचे दिसून आले. त्यांना नाल्यात काहीतरी हालचाल होत असल्याचे दिसले. मगर जाळ्यात अडकल्याचे पाहून चंदन यांनी तातडीने वन विभागाच्या पथकाला कळविले. वन्यप्रेमींनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मगरीला रेस्क्यू केले. वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशनचे रवी जाधव यांच्या नेतृत्त्वाखाली या मगरीचा पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात
सोडण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT