मुंबई

आदित्य ठाकरेंना भाजपाचा कुठलाही कार्यकर्ता हरवेल : अनुराग ठाकूर

दिनेश चोरगे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्रात संजय राऊत यांना कोणीही गांभीर्याने घेत नाही. आदित्य ठाकरे निवडणुका घेण्याच्या वल्गना करतात. मात्र त्यांना भारतीय जनता पक्षातील कुणीही कार्यकर्ता हरवू शकतो. त्यासाठी मला येण्याची गरज नाही. जे आपली पार्टी सांभाळू शकले नाहीत, त्यांच्याविषयी काय बोलायचे ? अशा शब्दांत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर चेंबूर येथील पत्रकार परिषदेत निशाणा साधला.

यावेळी भाजप- चे विधान परिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर, आ. कालिदास कोळंबकर, आ. कॅप्ट. तमिळ सेल्वन, आ. प्रसाद लाड उपस्थित होते. मात्र, जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अनुराग ठाकूर सोमवारी मुंबईतील दक्षिण मध्य मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत.

ते म्हणाले, भाजपने नेहमी युतीचा धर्म पाळला आहे. त्याबरोबरच संघटन मजबूत करण्यावरही भर दिला.
आहे. पंतप्रधान मोदी जागतिक स्तरावर लोकप्रिय नेतृत्व आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहे. सत्ता आमच्यासाठी सेवेचे माध्यम आहे.

ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचे शानदार बजेट सादर केले आहे. समाजातील सर्वच घटकांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. विकसित भारताची पायाभरणी करणारे यंदाचे बजेट आहे. रेल्वेचे २०१४ च्या तुलनेत नऊपट बजेट वाढले. काँग्रेस सरकारच्या काळात ११७१ करोड महाराष्ट्रासाठी मिळत होते. आज १३ हजार ७०० करोड एका वित्तीय वर्षात महाराष्ट्रासाठी देण्यात येणार आहेत. काँग्रेसने दिलेल्या निधीपेक्षा महाराष्ट्राला साडेअकरा पट अधिक हा निधी मिळाला आहे. कोविड काळात लघु उद्योगांना मदत करण्यात आली. त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था सुरळीत झाली. भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. परकीय गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतील अशा योजना येत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT