मुंबई

अ‍ॅड. सदावर्तेंना दिलासा देण्यास नकार; हायकोर्टाने धरले धारेवर

दिनेश चोरगे

मुंबई : एस.टी. संपाच्या आंदोलनात वकिलीचा कोट, गाऊन आणि आणि बँड घालून डान्स करून बेशिस्त वर्तन केल्याप्रकरणी वकिलीची सनद रद्द झालेल्या अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंना उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला.

न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने सदावर्ते यांना चांगलेच धारेवर धरत बार कौन्सिलची कारवाई रद्द करण्यास नकार दिला. सनद निलंबन निर्णयाविरोधात बार कौन्सिल ऑफ इंडियाकडे दाद मागण्याचे निर्देशही दिले.महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलने दोन वर्षासाठी सनद निलंबित केल्याने अडचणीत सापडलेल्या सदावर्ते यांनी हायकोर्टात दाद मागितली आहे.

SCROLL FOR NEXT