झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत? एबी फॉर्मवरील 'त्‍या' सहीमुळे राजकीय वाद  file photo
मुंबई

NCP News : झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत? AB फॉर्मवरील 'त्‍या' सहीमुळे राजकीय वाद

अजितदादांच्या राष्ट्रवादीतील बड्या नेत्याची आमदारकी धोक्यात?

पुढारी वृत्तसेवा

zeeshan siddique mla post in trouble over sunil tatkare ab form signature controversy

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

झिशान सिद्दीकी यांच्या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांनी सही केली आहे. त्‍यामुळे नवा वाद समोर आला असून, सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाने विधान परिषदेसाठी झिशान सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा केली होती. पक्षाच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यावर सिद्दीकी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. मात्र झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर होताच आता त्‍यांच्या आमदारकीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे. पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या एबी फॉर्मवरील सहीमुळे ही कायदेशीर अडचण निर्माण झाली आहे.

एकीकडे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष नाहीत, अशी चर्चा सुरू असताना झिशान सिद्दीकी यांच्या AB फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरे यांची सही आहे. सुनील तटकरे यांनी AB फॉर्मवर सही केल्याने झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.

काय आहे कारण?

२९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीने देण्यात आलेल्या पत्रात सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे ३० एप्रिल रोजी झिशान सिद्दीकी यांच्या AB फॉर्मवर सुनील तटकरे यांनी केलेल्या सहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या सहीने निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात पक्षाकडून पाठवण्यात येत असलेला हा पत्र व्यवहार अंतिम आहे असं समजावा असा देखील उल्लेख करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT