भांडुप ; पुढारी वृत्तसेवा
मुलुंड मध्ये एक (२२ वर्षीय) तरुणाने स्वतः च्या आईची हत्या करून लोकलखाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना (शनिवार) दि ९ रोजी मुलुंड मध्ये घडली. छाया महेश पांचाळ (वय ४६) असे मृत महिलेचे नाव असून, तिची हत्या तिचाच मुलगा जय याने केली.
या विषयी अधिक माहिती अशी की, मुलुंडच्या वर्धमाननगर मध्ये पांचाळ कुटुंबीय रहातात. शनिवारी संध्याकाळी मुलुंड पोलिसांना या ठिकाणी पांचाळ यांच्या घरातून रक्त येत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. मुलुंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घर उघडून पाहताच त्यांना घरात छाया पांचाळ रक्ताच्या थारोळ्यात गळा चिरलेल्या अवस्थेत ढळल्या. या वेळी पोलिसांना एक गुजराती भाषेत चिट्ठी देखील आढळली. छाया यांचा मुलगा जय याने ती लिहिली होती. या चिठ्ठी मध्ये त्याने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर त्याने मुलुंड रेल्वे स्थानकात लोकल खाली उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वडिलोपार्जित प्रॉपर्टी वरून आई आणि मुलगा डिप्रेशनमध्ये असल्याचे छाया यांच्या पतीने पोलिसांना सांगितले. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :