पुढारी ऑनलाईन डेस्क: Prajaktta Mali | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांंच्यावर टीका करताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिला लक्ष्य केले. यावेळी त्यांनी अश्लिल आणि निंदनिय विधान केले. या प्रकरणी प्राजक्ता माळीने महिला आयोगाकडे तक्रार केली होती. आयोगाकडून या तक्राराची दखल घेण्यात आली असून, या प्रकरणाच्या चाैकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आज (दि.३०) पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी चाकणकर म्हणाल्या की, "तक्रार अर्जाची प्रत बीड पोलीस अधिक्षक, मुंबई पोलीस अधिक्षक तसेच सायबर क्राईम यांना पाठवण्यात आली आहे. बीड सायबरकडून प्राजक्ता यांच्यावर करण्यात आलेल्या अश्लील आणि अशलाक्य विधानाची चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कायदेशी कार्यवाही करावी. कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल राज्य आयोगाला सादर करावा, असे पत्र देण्यात आल्याचे चाकणकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
बीड सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी नवनियुक्त पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या भेटीला आमदार धस गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेवर टीका केली होती. यावेळी सुरेश धस यांनी काही प्रसिद्ध अभिनेत्रींची नाव घेतली होती. त्यामध्ये प्राजक्ता माळीचेही नाव हाेते. सुरेश धस म्हणाले, ''जर कुणाला चित्रपट काढायचा असेल तर या अशा मोठ्या विभूतींवर काढता येईल. प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.'' यावेळी त्यांनी सपना चौधरी, रश्मिका मंदाना यांच्याही नावाचा उल्लेख केला हाेता.