सोने लुटून कर्ज फेडण्यासाठी तुर्भेतील महिलेची हत्या pudhari photo
मुंबई

Mumbai Crime News : सोने लुटून कर्ज फेडण्यासाठी तुर्भेतील महिलेची हत्या

कर्जबाजारीपणातून गुन्ह्याकडे वळला आरोपी; महिलेची हत्या उघड

पुढारी वृत्तसेवा

कोपरखैरणे : तुर्भे स्टोअर येथे पोत्यात आढलेल्या 66 वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे गुढ उकलले असून आरोपीने महिलेचे तोड दाबून हत्या केली. सोने लुटून कर्ज फेडण्यासाठी आरोपीने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. मोमीन नूर मोहम्मद कुरेशी ( वय 32) असे अटक आरोपीचे नाव आहे.

तुर्भे स्टोअर येथे पोत्यात अझारुन्निसा अब्दुल वाहिद खान या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. ही महिला सोमवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास भाजी आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. अझारुन्निसा आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. ती विसरभोळी आहे हे आरोपीला माहिती होते.

गोड बोलून तिचे सोने काढून घेऊ या उद्देशाने त्याने तिला निर्जन ठिकाणी अडवले. मात्र अझारुन्निसाने आरडाओरडा केली. त्यामुळे आरोपीने तिचे तोंड दाबून धरले. त्यातच तिचा मृत्यू झाला. नंतर आरोपीनेतिला पोत्यात भरत अंधारात पोतेे ठेवत तेथून पोबारा केला होता. दोनशेपेक्षा अधिक रहिवाशांची पोलिसांनी संवाद साधत आरोपीचा पोलिसांनी शोध घेतला.

  • आरोपीने अनेकांकडून कर्ज स्वरूपात आणि हात उसने म्हणून पैसे घेतले होते. त्याचा तगादा होता. त्यामुळे मयत महिला विसरभोळी असल्याने तिच्या गळ्यातील सोने बिनभोबाट काढून घेता येईल व ते विकून कर्ज फेडता येईल या हेतूने आरोपीने तो प्रयत्न केला. तिच्या अंगावरील सोने काढून ते त्याने सोनाराला विकले व ज्यांचा पैशांचा तगादा जास्त होता त्यांना त्याने पैसे दिल्याचे तपासात उघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT