पाकिस्तानने दाऊदला कुठे लपवले, भारत घेणार शोध Pudhari File Photo
मुंबई

India-Pakistan War : पाकिस्तानने दाऊदला कुठे लपवले, भारत घेणार शोध

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर दाऊ द पाकिस्तानातून निसटण्याच्या विचारात

अरुण पाटील

ठाणे : मुंबई हल्ल्यात अनेकवेळा मास्टरमाईंड म्हणून नाव पुढे असलेला दाऊद इब्राहीम दहशतवादी हल्ल्यामधील एक प्रमुख नाव असून दहशतवादाविरोधीची लढाई भारताने सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने दाऊदला सुरक्षित ठिकाणी लपवल्याचे सांगितले जात असून पाकिस्तानमध्ये आजही 18 दहशतवादी तळ कार्यरत असल्याने या विरोधातही भारत मोहीम उघडणार आहे. त्यामुळे दाऊदचा शोध भारत घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानात असलेल्या नऊ आतंकवादी ठिकाणांवर जोरदार हवाई हल्ला करून हे दहशतवादी अड्डे उडवून लावले. 7 मे रोजी राबवलेल्या ऑपरेशनमध्ये मारल्या गेलेल्या आतंकवाद्यांची नावे भारताने शनिवारी जाहीर केली आहेत. त्यात लष्कर-ए-तोयबाचा कुख्यात दहशतवादी व कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाइंड अबू जुंदाल याच्यासह मोहम्मद यूसुफ बॅक, हाफिज मुहम्मद जमील, मोहम्मद यूसुफ अजहर, खालिद ऊ र्फ अबू आक्शा, मोहम्मद हसन खान या आतंकवाद्यांचा समावेश आहे.

हे सर्व आतंकवादी भरताविरोधातल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते. भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणार्‍या सगळ्या नव्या-जुन्या दहशतवाद्यांची यादी भारताने तयार केली आहे. त्यात 1992 साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य आरोपी आणि मुंबई अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचे देखील नाव आहे. त्यामुळे गेली तीन दशके जगाच्या नजरेत न येण्यासाठी पाकिस्तानात घुसून बसलेला दाऊद कोणत्याही क्षणी भारताच्या निशाण्यावर येऊ शकतो.

मुंबई बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर भारतीय गुप्तचर यंत्रणाच नव्हे तर अंडरवर्ल्ड मधील छोटा राजन, अरुण गवळी असे डॉन म्हणून ओळखले जाणारे गुंडदेखील दाऊदच्या हत्येसाठी त्याच्या मागावर होते. मुंबईवर हल्ला केल्याची मोठी किंमत आपल्याला आज ना उद्या नक्कीच चुकवावी लागेल, याची जाण दाऊदला आहे. त्यामुळेच तो गेली तीन दशके पाकिस्तानाच्या बिळात घुसून बसला आहे.

आता मात्र ऑपरेशन सिंदूरनंतर दहशतवाद्यांची सर्व लोकेशन भारतीय सैन्याच्या टार्गेटवर आहेत. त्यात दाऊदचे कराची येथील घरदेखील निशाण्यावर आहे. कराचीत दाऊदचा आलिशान बंगला असून त्यास पाकिस्तानच्या आयएसआयसह तेथील स्थानिक प्रशासनाने संपूर्ण सुरक्षा दिलेली आहे. या बंगल्यातून दाऊद आपला राईट हँड छोटा शकीलच्या मदतीने आपले गुन्हेगारीचे साम्राज्य बिनदिक्कत चालवतो. भारत कधीही स्ट्राईक करून आपल्याला ठार करू शकतो, याची कल्पना दाऊदला आहे. त्यामुळेच तो कराची येथून नव्हे, तर पाकिस्तानातून इतर देशात पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशी सूत्रांची माहिती आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT