Mumbai Mega Block Pudhari
मुंबई

Mumbai megablock: परेवर आज मध्यरात्री, तर मरेवर उद्या मेगाब्लॉक

ट्रान्स हार्बर राहणार पाच तास बंद

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामांसाठी पश्चिम रेल्वेने शनिवारी मध्यरात्री तर मध्य रेल्वेने मुख्यमार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर रविवार 10 मे रोजी मेगाब्लॉक घेतला आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी नेरूळ अप व डाऊन मार्गावरील लोकल सेवा पाच तास बंद ठेवण्यात येणार आहे.

असा असणार मेगाब्लॉक

मध्य रेल्वे, मुख्य मार्ग

माटुंगा आणि मुलुंड : (अप-डाउन जलद मार्ग)

कधी : सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत

परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा लोकल पोहचतील.

ट्रान्स-हार्बर मार्ग

कुठे : ठाणे आणि वाशी व नेरुळ स्टेशन

कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत वाशी नेरुळ आणि ठाणे स्टेशन दरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईनवरील लोकल सेवा रद्द राहतील. ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 पर्यंत वाशी, नेरुळ, पनवेल येथे जाणाऱ्या डाउन लाईन सेवा आणि पनवेल, नेरुळ, वाशी येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 पर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील.

परेवर आज मध्यरात्री ब्लॉक

पश्चिम रेल्वेने बोरीवली आणि भाईंदर स्थानकांदरम्यान शनिवारी मध्यरात्री 12.30 ते सकाळी 4.30 या वेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर 4 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल विरार-वसई रोड ते बोरीवली व गोरेगाव दरम्यान अप जलद मार्गावरून चालवल्या जातील.

तसेच विरारच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सर्व गाड्या गोरेगाव ते वसई रोड-विरार दरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. रविवारी ब्लॉक राहणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT