मुंबई

Weather forecast: पुढील काही तासांत ‘या’ जिल्ह्यात मान्सूनपूर्वचा अंदाज

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राज्यातील काही जिल्ह्यात पुढील ३ ते ४ तासांत हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा (Weather forecast) अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या संदर्भातील अपडेट भारतीय हवामान विभागाने दिली आहे, असे पुणे विभागाचे विभागप्रमुख डॉ.के.एस.होसाळीकर यांनी X पोस्टवरून दिली आहे.

डॉ.होसाळीकर यांनी एक्स पोस्टध्ये म्हटले आहे की, पुढील काही तासांत राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर काही भागांत मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटांसह पाऊस (Weather forecast) आणि सोसाट्याच्या वाऱ्याची देखील शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather forecast: पुढील ५ दिवस राज्यात मान्सूनपूर्व

यंदा मान्सून दोन दिवस आधीच (गुरुवार. दि. ३० मे) केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान मान्सून लवकरच महाराष्ट्रात देखील पोहचण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी हवामान विभागाने राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज (Weather Forecast) वर्तवला आहे. गुरुवार ६ मे पर्यंत गोवासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात रिमझिम ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Weather forecast) पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT