मुंबई : मेट्रो रेल्वेचे काम सुरू असताना चेंबूर अमर महल जंक्शन येथे १२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला धक्का बसल्याने आज (दि.१९) पहाटो जलवाहिनी फुटली. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असले तरी घाटकोपर पूर्व पश्चिम गोवंडी मानखुर्द शिवाजीनगर वडाळा दादर आधी भागातील पाणीपुरवठा २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे.
जलवाहिनी फुटल्याने परळ भागातील के. ई. एम. , टाटा आणि वाडिया 'या' महत्वाच्या हॉस्पिटलच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असल्यानेच मुंबईत पाणीबाणी उद्भवली आहे, अशी माहिती देखील समोर आली आहे.