Villa Registration Scam Pudhari News Network
मुंबई

Villa Registration Fraud Case : व्हिला नोंदणीत फसवणाऱ्यास अटक

मुंबईस राज्यातील पर्यटकांची फसवणूक केल्याचे होणार उघड

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : व्हिला बुक करण्याचा बहाणा करुन अनेकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या आकाश रुपकुमार जाधवानी या आरोपीस वनराई पोलिसंनी अटक केली. आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध अशाच अनेक फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

यातील तक्रारदार गोरेगाव येथील असून त्याच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यासाठी ऑगस्ट महिन्यात दोन दिवसांच्या पिकनिकचे आयोजन करण्यात आले होते. सोशन मिडीयावर लोणावळा येथील व्हिला सर्च करताना त्याला ला राईव्ह व्हिलाची जाहिरात दिसली. त्याने संपर्क केला असता निशांत अहुजा नावाच्या एका व्यक्तीने १५ ऑगस्ट आणि १६ ऑगस्टला व्हिला उपलब्ध असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने त्याला दिड लाख रुपयांचे पेमेंट करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी पेमेंट केले होते. १४ ऑगस्टला निशांतने त्यांचे बुकींग कॅन्सल करुन चार दिवसांत पेमेंट परत करतो असे सांगितले.

मात्र एक आठवडा उलटून पेमेंट परत केले नाही. त्याचा मोबाईल बंद होता. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्याने वनराई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन आकाश जाधवानी याला अटक केली. तपासात आकाश हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याने अशाच प्रकारे अनेक ठिकाणी गुन्हे केले आहे. सोशल मिडीयावर व्हिला बुक करण्याच्या बहाण्याने त्याने अनेकांची फसवणूक केली होती. या पैशांतून त्याने मौजमजा तसेच महागडे वस्तू खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईसह इतर शहरात अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT