Vikhroli Double Murder pudhari
मुंबई

Vikhroli Double Murder: विक्रोळीत घराची वीज तोडण्यावरून वाद.. छोट्या भावाने मोठ्या भावासह १४ वर्षाच्या पुतण्यालाही संपवलं

Anirudha Sankpal

विक्रोळी पार्कसाईट येथील राहुल नगर परिसरात राहणाऱ्या विश्वकर्मा कुटुंबीयांमध्ये कौटुंबिक वादातून काल रात्री २ च्या सुमारास दुहेरी हत्या झाली या वादामध्ये सुनील विश्वकर्मा (वय ४०) आणि श्लोक विश्वकर्मा (वय १४) यांचा मृत्यू हा घटनेत झाला आहे आणि अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा हे जखमी झाले आहेत.

ही घटना कौटुंबिक वादातून झाली आहे गेल्या ५ दिवसांपासून विश्वकर्मा कुटुंबियांची घराची लाईट कापून टाकण्यात आली होती. त्यामुळे काल रात्री या वादातून ही घटना घडली आहे. असा शेजारी राहणाऱ्या नागरिकांच म्हणणं आहे. या वाद मिटवण्यासाठी काही शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मध्यस्ती केली. यावेळी आरोपी सुरेंद्र विश्वकर्मा याने शेजारी राहणाऱ्या महादेव मगर हे जखमी झाले. हा संपूर्ण वाद कौटुंबिक होता. मोठ्या भावाच्या कुटुंबावर लहान भावाने चाकूने हल्ला केला आणि आपल्याच मोठ्या भावाला आणि पुतण्याची हत्या केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT