विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल. (Pudhari Photo)
मुंबई

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अजित पवारांचे कट्टर समर्थक अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल

Vidhan Sabha Deputy Speaker | बिनविरोध निवडीची शक्यता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उद्या, २६ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यासाठी महायुतीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपला अर्ज दाखल केला.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बनसोडे यांची निवड बिनविरोध होईल, असे दिसते. नरहरी झिरवळ यांची मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर अजित पवार गटाकडून अण्णा बनसोडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी आमदार अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल करण्यात आला.

अण्णा बनसोडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक समजले जातात. ते पिंपरी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT