Vidhan Bhavan  Pudhari
मुंबई

Vidhan Bhavan Fake Entry Pass: विधान भवनमध्ये बोगस प्रवेश पास विक्रीचे रॅकेट

एमआयडीसीच्या बनावट लेटरहेडवर स्कॅन सह्यांनी पास तयार; दोन-अडीच हजार रुपये घेऊन विक्रीचा आरोप, चौकशीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : विधान भवन परिसर बॉम्बने उडवून देण्याची धमकी आल्याच्या पार्श्वभूमीवर प्रवेश कडक करण्यात आले असताना, दोन-अडीच हजार रुपये घेऊन काही कर्मचाऱ्यांनी एमआयडीसी लेटरहेडवर बोगस पास बनवून विक्री केल्याचे प्रकरण उद्योगमंत्र्यांनी उघडकीस आणले आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या बनावट लेटरहेडवर अधिकाऱ्यांच्या स्कॅन केलेल्या सह्यांच्या आधारे विधिमंडळाच्या शिपायांनीच हे प्रवेश पास तयार करून विक्री केले आहेत, असा आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

या बनावट लेटरहेडवर 50 अधिकाऱ्यांची नावे आणि हुद्दा आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची सीएमओकडून चौकशी करण्यात आली. चौकशीत लक्षात आले की, या शिपायांनी एमआयडीसीसह मंत्रालयातील इतर विभागांच्या नावानेही बोगस पत्रे बनवली आहेत. अशा दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी सभापतींकडे केली. त्यावर चौकशीअंती त्यांच्यावर अधिवेशन संपण्यापूर्वी कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सभापतींनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT