वाशी ते सीवूड्सला जोडणार मेट्रो ८, एकूण २० स्थानके  Metro File Photo
मुंबई

Vashi- Seawoods Metro: वाशी ते सीवूड्सला जोडणार मेट्रो ८, एकूण २० स्थानके

मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो 8 मार्गिका 34.89 किमी लांबीची असून यावर 20 स्थानके आहेत.

पुढारी वृत्तसेवा

1) मुंबई विमानतळ टी 2 (भुयारी), 2) फिनिक्स मॉल (भुयारी), 3) एसजी बर्वे मार्ग (भुयारी), 4) कुर्ला (भुयारी), 5) लोकमान्य टिळक टर्मिनस (भुयारी), 6) गरोडिया नगर (भुयारी), 7) बैंगनवाडी (उन्नत), 8) मानखुर्द (उन्नत), 9) आएसबीटी (उन्नत), 10) वाशी (उन्नत), 11) सानपाडा (उन्नत), 12) जुईनगर (उन्नत), 13) एलपी (उन्नत), 14) नेरूळ स्थानक (उन्नत), 15) सीवूड्स स्थानक (उन्नत), 16) अपोलो (उन्नत), 17) सागर संगम (उन्नत), 18) तारघर (उन्नत), 19) नवी मुंबई विमानतळ पश्चिम (उन्नत), 20) नवी मुंबई विमानतळ टी 2 (उन्नत)

मुंबई : मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणारी मेट्रो 8 मार्गिका 34.89 किमी लांबीची असून यावर 20 स्थानके आहेत. सिडकोने महाराष्ट्र शासनाला सादर केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालानुसार नवी मुंबईतील नेरूळ व सीवूड्स रेल्वे स्थानकांना ही मेट्रो मार्गिका जोडली जाणार आहे.

मेट्रो 8 मार्गिकेची उभारणी एमएमआरडीए आणि सिडको संयुक्तपणे करणार होते; मात्र नगरविकास विभागाने 27 जानेवारी 2025 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार या मार्गिकेची उभारणी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर केली जाणार आहे. आराखडा तयार करून निविदा राबवण्याची जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गिकेचा आराखडा सिडकोने तयार केला असून तो मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्येच त्याला मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

मुंबई विमानतळ टी 2, फिनिक्स मॉल, एसजी बर्वे मार्ग, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, गरोडिया नगर ही स्थानके भूमिगत असतील. उर्वरित मार्गिका उन्नत असणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे मेट्रो 8 मार्गिका रेल्वे मार्गाशी जोडली जाणार आहे. त्यामुळे विविध जिल्ह्यांतील प्रवाशांना रेल्वेमार्गे मेट्रोपर्यंत आणि मेट्रोतून विमानतळापर्यंत पोहोचता येईल. या मार्गिकेच्या उभारणीसाठी 20 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT