मुंबईः पुढारी वृत्तसेवा
धारावी हा पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे साम्राज्य उभारण्यासाठीचा रिअल इस्टेट प्रकल्प आहे. पात्रता निकष पूर्ण करत असतानाही रहिवाशांना अपात्र ठरवण्याचा अधिकार डीआरपीए किंवा अदानीला कोणी दिला, असा प्रश्न मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.
पुनर्विकासात विरोधकांनी राजकारण करू नये, असे वक्तव्य माजी खासदार राहुल शेवाळे यांनी खासदार वर्षा गायकवाड यांना टोला लगावत केले होते. या विधानाला प्रत्युत्तर देताना खा. गायकवाड म्हणाल्या की, लोकांनी दोनदा नाकारलेले अदानीचे एजंट पुन्हा एकदा बडबड करू लागले आहेत. राहुल शेवाळे यांचे वक्तव्य गोंधळलेल्या व्यक्तीचे उदाहरण आहे.