Crime News  pudhari photo
मुंबई

Job Fraud Mumbai : नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या काका-पुतण्याविरुद्ध गुन्हा दाखल

विमानतळावर नोकरीसाठी घेतले २२ लाख ६३ हजार रूपये

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या काका-पुतण्याविरुद्ध वाकोला पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. साई संजय फातरपेकर आणि सुधाकर फातरपेकर अशी या दोघांची नावे असून या दोघांनी तक्रारदार महिलेसह सहाजणांना खाजगी कंपनीसह नवी मुंबईतील विमानतळावर नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून घेतलेल्या २२ लाख ६३ हजाराचा अपहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

२७ वर्षांची तक्रारदार महिला नालासोपारा येथे राहत असून तिचे पती रत्नागिरी येथे एका खाजगी कंपनी चालक म्हणून काम करतात. ती स्वत नोकरीच्या शोधात होती. त्यामुळे तिचे वडिल तिच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होते. याच दरम्यान त्यांना सुधाकरविषयी माहिती समजली होती.

सुधाकर हा खाजगी कंपनीसह नवी मुंबईतील एअरपोर्टमध्ये नोकरी देण्याचे काम करतो. त्याने आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांना नोकरी मिळवून दिली आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलीच्या नोकरीसाठी सुधाकरला संपर्क साधून तिला नोकरी मिळवून देण्याची विनंती केली होती. यावेळी त्याने तिला नोकरीचे आमिष दाखवून तिचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि शैक्षणिक कागदपत्रे घेतली होती. या नोकरीसाठी त्यांनी तिला पावणेदोन लाख रुपये दिले होते.

दोघांची चौकशी

साई आणि सुधाकर यांनी तक्रारदार महिलेसह इतर पाच नातेवाईकांकडून २२ लाख ६३ रुपये घेतले होते, मात्र कोणालाही नोकरी न देता त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने वाकोला पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर साई आणि सुधाकर या काका-पुतण्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT