Jobs Pudhari
मुंबई

UPSC Engineering Jobs: अभियांत्रिकी सेवा परीक्षेतून ४८० पदांसाठी होणार भरती; ६ ऑक्टोबर अंतिम मुदत

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अर्ज प्रक्रिया सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीकडून अभियांत्रिकी सेवा (प्राथमिक) परीक्षा २०२७ अंतर्गत एकूण ४८० रिक्तपदांसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे विविध अभियांत्रिकी शाखांतील पात्र उमेदवारांना केंद्रीय अभियांत्रिकी सेवांमध्ये सामील होण्याची संधी मिळणार आहे.

या परीक्षेसाठी अर्ज पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार असून, अधिकृत वेबसाइट https:///upsc.gov.in/ वरून प्रक्रिया पूर्ण करता येईल. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ६ ऑक्टोबर २०२६ आहे. ही परीक्षा अभियांत्रिकी पदवीधरांसाठी महत्त्वाची संधी ठरणार आहे.

उमेदवारांसाठी वयोमर्यादा २१ ते ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना भरती नियमांनुसार सवलत दिली जाणार आहे. परीक्षेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांकडून २०० रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.

आयोगाकडून शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवाराने भारत सरकारच्या मान्यताप्राप्त विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी घेतलेली असावी किंवा इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स इंडियाच्या सेक्शन ए आणि बी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

तसेच, परदेशी विद्यापीठातील मान्यताप्राप्त पदवी किंवा डिप्लोमा, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्स असलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत. मूळ जाहिरातीत दिलेल्या अटींनुसारच पात्रता तपासणे आवश्यक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT