उद्धव ठाकरे file photo
मुंबई

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंवर अँजिओप्लास्टी

डॉक्टरांकडून विश्रांती घेण्याचा सल्ला

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सोमवारी येथील एच एन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली. त्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांच्या हृदयातील ब्लॉकेजची तपासणी केली. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

ठाकरे यांना गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासणी केली असता हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले. यानंतर ठाकरेंवर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठाकरेंवर १२ वर्षांनी अँजिओप्लास्टी

यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्यावर २०१२ मध्ये अँजिओप्लास्टी झाली होती. आता १२ वर्षांनंतर त्यांच्यावर पुन्हा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली आहे. त्यानुसार सर्व काही ठीक असून, लवकरच उद्धव हे लोकांची सेवा करण्यासाठी सज्ज होतील. सध्या त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT