Sharad Pawar Pudhari
मुंबई

Political News: विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमचा पाठिंबा: शरद पवार

विधान परिषदेच्या एकूण 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना दिलेल्या पाठिंब्याची शरद पवार परतफेड करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले आहे.

आता या निवडणुकीसाठी स्वतः उद्धव ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करतील, की पक्षातील अन्य नेत्याला संधी देतील, याकडे महाविकास आघाडीतील पक्षाचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेच्या एकूण 9 सदस्यांचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे.

यामध्ये भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर, शिवसेना शिंदे गटाच्या नीलम गोऱ्हे, अजित पवार गटाचे अमोल मिटकरी, शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे, ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांचा समावेश आहे.

विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या वाट्याला 8 तर महाविकास आघाडीला केवळ 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. एका जागेवरून आघाडीत ओढाताण सुरू असतानाच शरद पवार यांनी आपले माप उद्धव ठाकरे यांच्या पारड्यात टाकले आहे.

पवार म्हणाले, माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी मोलाची मदत केली. आता विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमचे पूर्ण सहकार्य राहील. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे तीनही पक्ष निर्णय घेतील. कोणताही निर्णय सामूहिक पद्धतीने घेतला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT