Uddhav Thackeray file photo
मुंबई

Uddhav Thackeray: शेतकऱ्यांना सल्ले देणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमीन कशी मिळाली? उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray on Ajit Pawar : परभणी येथे आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात उध्दव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यासह राज्यातील महायुती सरकारवर घणाघाती टीका केली.

मोहन कारंडे

Uddhav Thackeray on Ajit Pawar

मुंबई : शेतकऱ्यांना सगळच फुकटात कसं चालणार, म्हणणाऱ्या अजित पवारांना हातपाय न हलवता फुकटात जमीन कशी मिळाली? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

आज (दि.८) परभणीत आयोजित शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी उध्दव ठाकरे पुढे बोलताना राज्यातील महायुती सरकारवर घणाघाती टीका केली. सरकाने पक्ष चोरला, मतं चोरली, आता जमीन चोरत आहे. पार्थ पवारला मुख्यमंत्र्यांनी क्लीन चीट दिली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

कर्जमाफी नको कर्जमुक्ती हवी

आता कर्जमुक्ती नाही करायची मग कधी करायची? कर्ज माफीचा अहवाल एप्रिल पर्यंत येईन आणि जूनमध्ये कर्जमाफी होईल, असे सांगत आहेत. पण कर्जमाफी नको आता कर्जमुक्ती हवी आहे. आता संकट असताना जूनमध्ये कर्जमाफीचा निर्णय का? पेरणी करताना शेतकरी रडतात अशी परिस्थिती आहे. सरकारचे काम आहे शेतकऱ्याला मेहनतीचे मोल द्या. सगळे वाहून गेले, आयुष्य वाहून गेले आता नाही केली कर्जमुक्ती तर कधी करणार असा सवाल त्यांनी केला. जिल्हाधिकाऱ्यांची गाडी फोडली त्या शेतकऱ्याचे कौतूक करत गाडी फोडा असा सल्ला त्यांनी शेतकऱ्यांना दिला. धोंडे मारण्याची वेळ सरकारने आणली आहे, असे ते म्हणाले.

पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावर काय म्हणाले?

दरम्यान, शेतकरी कर्जमाफी ३० जूनपूर्वी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर अजित पवार यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांनी सुद्धा वेळेत कर्ज फेडण्याची सवय लावावी. सारखं फुकटात कसं चालणार? अस वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचा दाखला देत आज उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. "अजित पवारांना हातपाय न हलवता जमीन कशी मिळाली?," असा टोला त्यांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT