Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
मुंबई : "उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना मराठा समाजासाठी एकही काम केले आहे का हे सांगावे. आमचे सरकार मात्र कायदेशीर मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे," अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
"आज आम्ही महाराष्ट्रात जवळजवळ ३४ हजार कोटी रुपयांचे १७ सामंजस्य करार केले. यामुळे राज्यात रोजगार वाढेल. आम्ही अतिशय विश्वासार्ह संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मराठा मोर्चाचे नेते मनोज जरांगे हे आंदोलनासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर विरोधकांची भाषा बदलली आहे. ओबीसी आणि मराठा समाज एकमेकांसमोर आले पाहिजेत. त्यांच्यात भांडणे लागायला हवीत, असे काहींचे प्रयत्न आहेत. सकाळपासूनच्या त्यांच्या विधानातून तसे प्रयत्न लक्षात येत आहेत. मात्र, विरोधकांनी आंदोलनावर राजकीय पोळी भाजायचा प्रयत्न करू नये. यात त्यांचेच तोंड भाजले जाईल, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधकांना फटकारले आहे.