उद्धव ठाकरे  (shivsena X)
मुंबई

Maharashtra politics : 'आ. गायकवाडांना मार्शल आर्ट येते; मग मुख्यमंत्र्यांना कोणती 'आर्ट' येते?'

कॅन्‍टीन कर्मचारी मारहाणप्रकरणी उद्धव ठाकरेंचा टोला

पुढारी वृत्तसेवा

"आमदार संजय गायकवाड आता शिवसैनिक नाहीत. ते आता एसंशी पक्षाचे आहेत. ते म्‍हणत असतील तर त्‍यांना मार्शल आर्ट येत असेल. तर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणते आर्ट येते?, असा टोला लगावत आम्ही नाही करू शकलो असे म्‍हणतात तर तुम्ही करा. प्रत्येक वेळेला आम्ही का जबाबदार धरता? आज सरकारमध्‍ये जे बसले आहेत गेली अडीच वर्षांपूर्वीही होते. मात्र त्यांची हास्‍यजत्रा सुरु आहे, अशा शब्‍दांमध्‍ये शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी राज्‍य सरकारवर निशाणा साधला. आझाद मैदान येथे सुरु असलेल्‍या गिरणी कामगारांच्‍या आंदोलनास भेट दिल्‍यानंतर ते माध्‍यमांशी बोलत होते. (Maharashtra politics)

प्रत्येक वेळेला आम्हाला का जबाबदार धरता?

मला मार्शल आर्ट येते, असे संजय गायकवाड म्‍हणतात, असे यावेळी उद्धव ठाकरेंना सांगण्‍यात आले. यावर ते म्‍हणाले की, संजय गायकवाड यांना मार्शल आर्ट येत असेल तर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणते आर्ट येते?. आम्ही नाही करू शकलो तर तुम्ही करा. प्रत्येक वेळेला आम्ही का जबाबदार धरता असा सवाल करत आज ते बसले आहेत गेली अडीच वर्ष ते होते. त्यांची हास्‍यजत्रा सुरु आहे, असा टोला लगावत मीरा रोडवर स्‍थानिक मराठी माणसांना दादागिरी सहन करावी लागते. याला राज्‍य सरकार जबाबदार आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

राज्‍य सरकारने गिरणी कामगारांच्‍या तोंडाला पाणी पुसली

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्‍हणाले की, आज विधिमंडळात येण्याआधी आझाद मैदानात गेलो. विना अनुदानित शिक्षक आणि गेले अनेक वर्ष आम्हाला घर द्या म्हणणारे गिरणी कामगारांचे आंदोलन सुरु आहे. लोकांच्या व्यथा मांडायला ते आझाद मैदानात बसले आहेत.गिरणी कामगार संप तांत्रिक दृष्ट्या अजूनही सुरु आहे. गिरणीच्‍या जागांवर अनेक मॉल्स टॉवर उभे राहीले. गिरणी कामगार बेघर झाला आहे. राज्‍य सरकारने गिरणी कामगारांच्‍या तोंडाला पाणी पुसलं, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. आमच्यावर आरोप केला जातो कि मराठी माणसासाठी शिवसेनेने केल कायपण आमचं सरकार पाडलं नसत तर आम्ही घर द्यायला सुरुवात केली होतीच पण अजून दिली असती, असेही ते म्‍हणाले.

विरोधी पक्ष नेतेपदाबाबत सरकारने निर्णय घ्‍यावा

विरोधी पक्षनेतेपदाबाबत आम्‍ही मंगळवारी सरन्यायाधीशांना पत्र दिले आहे. आपल्या देशात अल्प मतातलं सरकार चालते. अल्प मतातला माणूस पंतप्रधान होऊ शकतो मुख्यमंत्री होऊ शकतो. त्‍यामुळे विरोधी पक्ष नेतेपदासाठी संख्‍या बळाचा मुद्‍दा आक्षेप चुकीचा आहे, असेही त्‍यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT