भैय्याजी जोशी यांच्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  Pudhari Photo
मुंबई

...तर भैय्याजी जोशी चिल्लर माणूस असल्याचे जाहीर करावे; उद्धव ठाकरेंचे आव्हान

Uddhav Thackeray on Bhaiyyaji Joshi | उत्तर विरुद्ध दक्षिण अशी देशाची विभागणीचा भाजपचा डाव

पुढारी वृत्तसेवा

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर करवाई करण्याची मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर चिल्लर माणूस आहे, असे म्हटले आहे. यावर टीका करताना फडणवीस यांनी भैय्याजी जोशीदेखील चिल्लर माणूस असल्याचे जाहीर करावे, नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहचा गुन्हा दाखल करावा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. ६) दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, या लोकांनी हिंदू- मुस्लिम असा वाद काढला नाही, तर आता मराठी- मराठी असा वाद काढलेला आहे. भैय्याजी जोशी घाटकोपरमध्ये येऊन काल बरळून गेले. त्यांना त्यांना मी आव्हान करतो की, अशी गोष्ट कर्नाटक, तामिळनाडू, बंगालमध्ये जाऊन बोलून दाखवा, अशी भाषा केल्यानंतर तेथून सुखरूप परत येऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.

सगळे लोक छावा चित्रपटाला बघायला गेले नव्हते. काही अनाजी पंतही गेलेले नाहीत. अनाजी पंत याही काळात जन्माला आलेले आहेत. जसे काय आम्हीच सगळ्यांना ब्रह्मज्ञान शिकवले आहे, असा भास करून काही लोक वावरत आहेत, असा टोला उपंमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लगावला.

भाजपला उत्तर विरुद्ध दक्षिण अशी देशाची विभागणी करायची आहे. भाजपला इंडिया नाहीतर हिंदीया करायचा आहे. भाजपमध्ये असलेल्या सगळ्या लोकांना जर मराठी भाषेबद्दल काही वाटत असेल, तर जोशी य़ांच्यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा हा संघाचा छुपा अजेंडा असल्याचा स्पष्ट होईल. भाजपची आणि संघाची अशी प्रवृत्ती आहे की, त्या ठिकाणी पिल्लू सोडायचं आणि पिल्लू मोठे झाले की खांद्यावरती घ्यायचे, अशी टीका टाकरे यांनी यावेळी केली.

तुम्ही तुम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला म्हणजे काही उपकार केले नाहीत. मी मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीचा कायदा केलेला आहे. सरकारला माझे सांगणे आहे की, मुंबई निर्मितीसाठी २८० लोकांनी बलिदान करून मुंबई मराठी माणसाला मिळवून दिलेली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये येऊन तुम्ही साखरेचा खडा देऊ शकत नसाल, तर निदान मिठाचा खडा टाकू नका. आम्ही हे बोलून शांत बसणार नाही, तर आम्ही हुतात्मा चौकात जाऊन सर्व हुतात्म्यांना नमन करणार आहे, असे ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT