Eknath Shinde File Photo
मुंबई

Maharashtra Politics: ठाकरेंच्या जवळचे खासदार शिंदेंच्या भेटीला; पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा

मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात ही भेट घेतली असल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीने पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी सोमवारी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात ही भेट घेतली असल्याचे सांगितले जात असले तरी या भेटीने पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सहा खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. या सहा खासदारांमध्ये नागेश पाटील- आष्टीकर यांचे नाव घेतले जात होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी असा कोणताही पक्षप्रवेश होणार नाही, तसेच ऑपरेशन टायगर सक्रिय नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता.

आपल्या मतदारसंघातील कामासाठी अन्य पक्षांतील आमदार,खासदार मला नेहमीच भेटत असतात. नागेश अष्टीकरदेखील त्यांच्या मतदारसंघातील कामानिमित्त मला भेटण्यासाठी आले होते. या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT