Uddhav Thackeray Raj Thackeray Marathi Victory Rally Mumbai 2025
मुंबई : राज्य सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मराठी जनतेच्या एकजुटीचा विजय जल्लोष साजरा करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेकडून शनिवारी सकाळी ११ वाजता वरळीतील एन.एस.सी.आय. डोम येथे मराठी जनांचा विजय मेळावा होत आहे. उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत आहेत, हे या मेळाव्याचे मुख्य आकर्षण होय. मेळाव्यात फक्त उद्धव व राज ठाकरे या दोघांचीच भाषणे होणार असल्याचे समजते. पहिले भाषण कोण करणार याबाबत उत्सुकता आहे.
व्यासपीठावर फक्त पक्षप्रमुख आणि सहभागी होणाऱ्या पक्षांचे पक्षाध्यक्ष असतील.
सुत्रांच्या माहितीनुसार फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मंचावर असण्याची शक्यता
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात पहिले भाषण हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील आणि शेवटचे भाषण हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील.
या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड येतील, तर सीपीआय पक्षाचे प्रकाश रेड्डी या विजयी मेळाव्याला हाजेरी लावणार आहेत.
वरळी डोममध्ये जवळपास ७ ते ८ हजार लोक बसण्याची व्यवस्था आहे.
वरळी डोमच्या हॉलमध्ये तसेच हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावरही एलईडी स्क्रीन लावण्यात आल्या आहेत.
मोठी गर्दी झाली आणि वरळी डोममध्ये जागा शिल्लक राहिली नाही तर बाहेरही उभे राहून कार्यक्रम पाहता यावा यासाठी एलईडी स्क्रीन्स लावण्यात आल्या आहेत.
पार्किंगसाठी वरळी डोमच्या बेसमेंटमध्ये ८०० गाड्यांच्या पार्किंगची उपलब्धता आहे. त्यासोबतचं महालक्ष्मी रेस कोर्सवर ही गाड्यांची पार्किंग असणार आहे.
वरळी डोमच्या समोर कोस्टल रोडच्या पुलाखाली दुचाकी पार्क करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
शेवटी आज तो दिवस आला आहे, जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकाच मंचावर महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. आज वरळी येथील डोममध्ये दोन्ही ठाकरेंच्या तोफा धडाडणार आहेत. सकाळी ११ वाजता विजयी मेळाव्याला सुरवात होईल. विशेष म्हणजे या विजयी सोहळ्याची निमंत्रण पत्रिकांचे पोस्टर सध्या मुंबईच्या रस्त्यावर पाहायला मिळत आहेत. या पोस्टरवर कुठेचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. तसेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गट पक्षाचा झेंडा देखील नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले आहेत. 'कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा' असं लिहिण्यात आलं आहे