Sairat Actor Arbaj Sheikh file photo
मुंबई

Sairat Actor Arbaj Sheikh: 'सैराट'मधील 'सल्या'च्या वडिलांच्या उपचारासाठी मंत्री उदय सामंत यांच्याकडून १ लाखांची मदत

'सैराट' मधील अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांच्या उपचारासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने संवेदनशीलतेचे दर्शन घडवत १ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Sairat Actor Arbaj Sheikh:

सोलापूर: प्रसिद्ध मराठी चित्रपट 'सैराट' मधील 'सल्या' या भूमिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख याच्या वडिलांवर सध्या सोलापूर येथील वळसंगकर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अरबाजच्या कुटुंबावर आलेल्या या संकटसमयी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तातडीने संवेदनशीलतेचे दर्शन घडवत १ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या मदतीचा धनादेश नुकताच अभिनेता अरबाज शेख याच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

आज सकाळीच उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सोलापूर येथील रुग्णालयात जाऊन अरबाज शेख आणि त्याच्या कुटुंबाची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करत, मदत करण्याचे आश्वासन दिले होते.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मोठे दातृत्व दाखवले. त्यांनी अरबाजच्या वडिलांच्या उपचारासाठी तातडीने एक लाख रुपयांचा धनादेश त्वरित अरबाजकडे सोपवला. वळसंगकर हॉस्पिटलमधील उपचाराच्या खर्चासाठी ही मदत अत्यंत मोलाची ठरणार आहे.

ऐन संकटसमयी एका उदयोन्मुख कलाकाराच्या कुटुंबाला धीर देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेचे आणि दातृत्वाचे सर्वच स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT