नवी मुंबई; पुढारी ऑनलाईन : नवी मुंबईतील पाम बीच रोडवर तीन गाड्यांच्या अपघातात दोन जण जखमी झाले. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. यावेळी दोन गाड्या एकमेकांना धडकल्याने त्यांच्यात रस्त्यावरच वाद सुरू होता. त्याचवेळेला एक कार मागून आली अन तिने मध्ये उभ्या असलेल्या दोन्ही वाहनांना आणि बाहेर उभे असलेल्या वाहनातील प्रवाशांना जोरदार धडक दिल्याने यात दोनजण जखमी झाले.
दरम्यान पाम बीच रोडवर दोन गाड्यांचा एकमेकांना धडकल्या होत्या. या धडकेमुळे दोन्ही वाहनातील प्रवाशी आपली वाहने रस्त्याच्या मध्येच थांबवून एकमेकांशी वाद घालू लागले. या वेळी पाठिमागून भरधाव वेगात एक कार आली आणि तिने मध्ये उभ्या असलेल्या दोन्ही वाहनांना धडक दिली. यावेळी तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच वाहना बाहेर उभे असणारे दोन प्रवाशी या अपघात जखमी झाले. यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली असून त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून,अधिक तपास सुरू आहे. यात तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, एका वाहनाच्या समोरच्या बाजूचा चक्काचूर झाला आहे.