ठाणे ः बारवी धरणातून शनिवारी 4.40 क्युसेक्सने पाणी विसर्ग सुरू होता. यामुळे ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी - निजामपूर या महानगरपालिका तसेच अंबरनाथ आणि बदलापूर या नगरपालिका तसेच ठाणे जिल्ह्यातील एमआयडीसीला मोठा दिलासा मिळाला आहे.  pudhari photo
मुंबई

Tulsi Barvi dams overflow : तुळशी, बारवी ओव्हरफ्लो

पावसामुळे मुंबईसह ठाणे जिल्हा, नवी मुंबईला पाणी दिलासा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/ठाणे : शुक्रवार सायंकाळपासून रात्रभर कोसळणार्‍या पावसाने मुंबई, ठाणे व नवी मुंबई शहरांना पाणीपुरवठा करणार्‍या धरण क्षेत्रांतही दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नॅशनल पार्कमधील तुळशी तलाव व बारवी धरण ओव्हरफ्लो झाले.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या सातही तलावांमध्ये मिळून 1,30,498.1 कोटी लीटर (13,04,981 दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच 90.16 टक्के पाणीसाठा झाला आहे. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणारा ठाणे जिल्ह्यातील भातसा तलावातील पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. या तलावातील पाणीसाठा 88.65 टक्केवर पोहचला आहे. तुळशी तलाव संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात स्थित असून तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता 804.60 कोटी लीटर (8,046 दशलक्ष लीटर) इतकी आहे. हा तलाव शनिवारी दुपारी भरून वाहू लागला आहे. विहार तलावातील पाणीसाठाही 87 टक्केवर पोहचला आहे. विहार व तुळशी तलाव क्षेत्रात गेल्या 24 तासात 120 ते 133 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

ठाणे जिल्ह्यासह नवी मुंबईच्या काही भागाला पाणीपुरवठा करणारे एमआयडीसीचे बारवी धरण शनिवारी दुपारी ओसंडून वाहू लागले. धरणात सध्या 339.20 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. उंची 72.55 मीटर इतकी असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर ते 72.60 मीटर इतक्या उंचीवरून पुर्ण ओसंडून वाहू लागले आहे. बारवी धरणावरील अकरा स्वयंचलित दरवाजांच्या वाटे 4.40 क्युसेक पाणी ओसंडून वाहत आहे.

ठाणे जिल्ह्यातील सहा महानगरपालिका, दोन नगरपालिका आणि औद्योगिक क्षेत्र व नवी मुंबईचा काही भागाला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे हे धरण पूर्ण क्षमतेने ऑगस्टच्या महिन्याच्या मधोमध भरल्यामुळे पुढील वर्षभर ठाणे जिल्ह्यावरील पाणी कपातीचे संकट टाळणार आहे. धरण पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत सुमारे 2090 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.बारवी धरण परिक्षेत्रातील पाणलोट क्षेत्रात आतापर्यींत 2090 मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बारवी धरणातून जवळपास पाच किसेस इतका पाण्याचा विसर्ग होत आहे पावसाचा जोर वाढल्यास पाण्या चा विसर्ग नैसर्गिकरीत्या वाढणार आहे. त्यामुळे बारवी नदीकाठी असलेल्या गावांना एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

  • बारवी धरण हे ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे सर्वात मोठे धरण आहे. गेल्या वर्षी धरण हे 7 ऑगस्ट रोजीच पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा पावसाळा हा सातत्यपूर्ण ऑगस्ट च्या मध्यातच धरण भरल्यामुळे पुढील वर्षभर नागरिकांना पाणी कपातीचा प्रश्न राहणार नाही.

तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लीटरमध्ये)

अपर वैतरणा - 1,94,854

मोडकसागर - 1,14,081

तानसा - 1,42,298

मध्य वैतरणा - 1,86,297

भातसा - 6,35,638

विहार - 24,098

तुळशी - 7,715

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT