Tukaram Mundhe on Diwali | दिवाळी हा खाद्यपदार्थांचा सण आहे आणि या काळात ग्राहकांच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले जाईल असे एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळीत एक्पायरी झालेला माल विकला जाऊ नये यासाठी कारवाई सुरु झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येक खाद्यपदार्थाच्य पॅकिंगवर एक्पायरी डेट कंपल्सरी घालावी लागणार आहे असेही मुंढे यांनी स्पष्ट केले आहे.
दिवाळीत कालबाह्य पदार्थ विकल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. योग्य तेलाचा वापर करणे तसेच भेसळयुक्त कोणताही पदार्थ तयार करु नये असा इशाराही तुकाराम मुढें यांनी व्यावसाईकांना दिला आहे. विशेष करून फराळ आणि स्वीट बाबतीत कारवाई सुरू झाल्या असून, मिठाई तयार करताना त्यामध्ये जास्त कलर मिसळू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.
एफडीए प्रमुख तुकाराम मुंडे यांच्या वक्तव्यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते केवळ व्यवसायांवरच नव्हे, तर प्रशासकीय यंत्रणेवरही समान जबाबदारी निश्चित करते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर अन्न व्यवसाय चालकांनी स्थापित मानके आणि नियमांचे पालन केले नाही, तर त्यांना कायद्यानुसार कठोर परिणाम आणि दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल. इतकेच नव्हे, तर जर अन्न व औषध प्रशासनाचे स्वतःचे अधिकारी राज्यात या नियमांची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरले, तर त्यांनाही प्रशासकीय परिणाम आणि कारवाईला सामोरे जावे लागेल.
विभागातील ५ अधिकारी सस्पेंड
कारवाईमध्ये भ्रष्टाचार होतो काही अन्न प्रशासनातील अधिकारी प्रकरण दाबण्यासाठी पैसे घेतात या संबधी उत्तर देताना मुंढे यांनी विभागातील अशा पाच अधिकाऱ्यांना सस्पेंड केले असल्याचे सांगितले आहे. आपल्या अधिकाऱ्यांची जबाबदारी काय आहे हे आपण त्यांना स्पष्ट करुन सांगतो असे त्यांनी सांगितले. आमच्या विभागातर्फे अशी सिस्टिम तयार केली जात आहे की कोणत्या इंडस्ट्रीजने काय केले पाहिजे याबाबात स्पष्टता येईल.
कालबाह्य झालेला, परत आलेले व खराब फूड बाबत ऑर्डर
पुढे त्यांनी सांगितले की अनेक गोडावूनमध्ये एस्पायरी पदार्थ ठेवले जातात ते विक्री होण्याचा धोका असतो. काही ठिकाणस असे एस्पायर ऑर्डर नष्ट न करतरा परत वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले जात असे आमच्या समोर आले आहे. काही जण कागदोपत्री पदार्थ नष्ट केले असे दाखवतात पण परत ते पॅकेजिंग करून नागरिकांना दिले जात. यासंबधी आता एक नवीन आदेश काढला आहे. यानुसार आता अशा गोष्टींना आळा बसेल. तसेच गुलजार नगर भिवंडी येथे आपण साठा जप्त केला आहे, वाडपे भिवंडी येथे देखील साठा जप्त केला.,अंबरनाथ , पडघा येथील एकूण १० कारवाईंमध्ये अनेक कोटींचा साठा जप्त केला आहे व यात ३४ आरोपी पकडले आहेत अशी माहिती त्यांनी दिली.