मुंबई

डॉ. प्रभा अत्रे यांचे जीवन म्हणजे संगीताची अखंड तपस्या : रमेश बैस

मोहन कारंडे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विख्यात शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी दुःख व्यक्त केले आहे.

डॉ. प्रभा अत्रे या संशोधक वृत्तीच्या प्रयोगशील गायिका व संगीत रचनाकार होत्या. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी नवतेचा अंगीकार केला. भारतीय शास्त्रीय संगीत एका मोठ्या उंचीवर नेले. आपला सांगीतिक वारसा पुढे नेताना त्यांनी शिष्यांना मुक्तहस्ते विद्यादान केले. डॉ. अत्रे यांच्या रचना अजरामर आहेत. त्यांचे जीवन ही अखंड तपस्या होती. त्यांच्या महान कार्याला वंदन करतो व त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपाल बैस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत : अजित पवार

मुंबई : "ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाने ज्ञान, विज्ञान, विधी, कला, साहित्य, संगीत अशा अनेक क्षेत्रात सर्वोच्च कर्तृत्व गाजवणारं प्रतिभावंत व्यक्तिमत्वं हरपलं आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील वैभवशाली युगाचा अंत झाला आहे. त्यांनी आठ दशकांहून अधिक काळ आपल्या अप्रतिम गायनानं भारतीय संगीतक्षेत्र समृद्ध केलं. कोट्यवधी रसिकांची मन जिंकली. ठुमरी, दादरा, गझल, भजन, भावसंगीत, नाट्यसंगीत, उपशास्त्रीय संगीतासारख्या गायकीतून गानरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. पुण्यात जन्मलेल्या डॉ. प्रभाताई महाराष्ट्रासाठी, देशासाठी, जागतिक संगीत क्षेत्रासाठी भूषण होत्या. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांनी गौरवलेल्या डॉ. अत्रे यांचे निधन ही देशाच्या संगीत, कलाक्षेत्राची फार मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो," अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT