राज्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या ७९ अधिकाऱ्यांच्या बुधवारी गृहविभागाने बदल्या केल्या. File Photo
मुंबई

राज्यातील ७९ एसीपींच्या बदल्या

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : राज्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त पदाच्या ७९ अधिकाऱ्यांच्या बुधवारी गृहविभागाने बदल्या केल्या. त्यामध्ये मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे, तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मिरा-भाईंदर आयुक्तालयातील १३ एसीपींचा यादीत समावेश आहे.

या बदल्यांमध्ये शैलेश पासलकर नवी मुंबई ते मुंबई, इंद्रजित कारले ठाणे ते नवी मुंबई, धनाजी क्षीरसागर नवी मुंबई ते ठाणे, सुनील कुराडे ठाणे ते पिंपरी चिंचवड, सुहास हेमाडे मुंबई ते ठाणे शरद ओहाळे मुंबई ते ठाणे, हेमंत शिंदे नागपूर शहर ते ठाणे, विठ्ठल कुबडे सोलापूर ते नवी मुंबई, अरुण पाटील ठाणे ते एसीबी मुंबई, निलेश सोनावणे ठाणे ते मिरा-भाईंदर, पद्माजा बढे मिरा-भाईंदर ते नाशिक, अभिजीत धाराशिवकर बीड अष्टी ते पालघर उपविभाग, प्रकाश चौघुले छत्रपती संभाजी नगर ते मुंबई, गीतांजली दुधाणे मिरा भाईंदर ते नवी मुंबई.

सूर्यकांत जगदाळे अमरावती ते ठाणे, नवनाथ घोगरे जालना ते मिरा-भाईंदर, प्रशांत राजे अमरावती ते मुंबई, सुनील कुराडे ठाणे ते पिंपरी-चिंचवड, चंद्रकांत भोसले लोहमार्ग पुणे ते ठाणे, संध्या भिसे डीजी कंट्रोल ते ठाणे, प्रदीप लोंढे गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ते नवी मुंबई, भाऊसाहेब ढोले पुणे ग्रामीण ते नवी मुंबई, अमोल मांडवे मिरा-भाईंदर ते पुणे ग्रामीण या अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. आबेद रौफ सैय्यद यांची मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाच्या अप्पर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर सुरेश पाटील यांची जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मुंबई पोलीस उपअधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.डी. आर. कुलकर्णी यांची रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी, तर व्ही. जी. मगर यांची पुणे शहर पोलीस उपायुक्तपदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT