बंदी असतानाही एपीएमसीमध्ये व्यापारी मागवतात चिनी लसूण Garlic Price
मुंबई

बंदी असतानाही एपीएमसीमध्ये व्यापारी मागवतात चिनी लसूण

वाढत्या आयातीमुळे दर २०० रुपयांनी किलोमागे घसरले

पुढारी वृत्तसेवा

नवी मुंबई : Garlic Price | मुंबई एपीएमसीत लसणची गेल्या चार महिन्यांपासून आवक घटली होती. त्यामुळे लसणाचे दर तब्बल चारशे रुपये किलोपर्यंत पोहचले होते. मात्र गेल्या आठवड्यात येथील सात व्यापाऱ्यांनी चिनी लसणावर बंदी असतानाही इतर देशाच्या नावाने चिनी लसूण बाजारात आणून त्याची विक्री सुरु केली आहे.

चिनी लसणाची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने लसणाचे दर १५० ते २०० रुपये किलोवर घसरले. मात्र चिनी लसणामुळे देशी लसणाकडे व्यापाऱ्यांसह ग्राहकांन ही पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. एपीएमसी येथील व्यापाऱ्यांनी चिनचा लसूण मागवला आहे. दररोज १० कंट्रेनर चिनी लसूण घाऊक बाजारात येतो. यामुळे एपीएमसीत लसणाचे दर घाऊकला उत्तम प्रतीच्या लसणाचे दर ३०० ते ४०० रुपये किलोवरुन १५० ते २०० रुपये किलोवर आले. चिनी लसूण नसता तर घाऊक बाजारात लसणाचे दर पाचशे रुपये किलोपर्यंत पोहचले असते. अशी माहिती घाऊक देतात. किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा लसूण १६० ते २२५ रुपये किलो आहे.

प्रत्येक स्वयंपाक घरात कोणत्याही पदार्थाची चव वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या लसणाला बाजारात वर्षभर मागणी असते. गेले काही दिवस घाऊक बाजारात लसणाचे दरात वाढ असल्याचे दिसून आले. अनेक व्यापाऱ्यांनी चिनी लसणाची खरेदी केली असून एपीएमसीत हा लसुण तुर्कि, आफगाणिस्तान, इराक, इराणच्या नावाने विक्री करत असल्याचा दावा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी केला आहे. घाऊक बाजारात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून लसणाची दररोज १० गाडी आवक होते. चिनी लसणाच्या दररोज किमान १० ते १५ कंटेनर एपीएमसीत उतरतो. मात्र हेच व्यापारी हा लसूण तुर्कि आफगाणिस्तान, इराक, इराणच्या नावाने विक्री करतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT